Man Suddha Tuza Gosht haye Song Lyrics in Marathi

मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथ्वी मोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची
पर्वा बी कुनाची.

झेंडा भल्या कामाचा जो घेउनी निघाला
काटंकुटं वाटंमंदी बोचति त्येला
रगत निगंल तरि बि हंसल, शाबास त्येची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची
पर्वा बी कुनाची.

जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटि लडाई
अन्‌ हत्याराचं फुलावानी घाव बी खाई
गळ्यामंदी पडंल त्येच्या माळ विजयाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची
पर्वा बी कुनाची

गीत – शांताराम आठवले
संगीत – केशवराव भोळे
स्वर – मास्टर परशुराम
चित्रपट – कुंकू