नाकी डोळी नीट डाव्या गालावर तीट
केसांची बट जिथं खुलायची, पुरुषाची जात तिथं फसायची
रंगमहालाचा हिरवा रंग, खुलवितो प्रीती तो रंग
घ्यावा अनुभव बसून संग
पडली हवा थंडगार, अंगी झोंबतो शहार
दिव्यातली वात जिथं विझायची, पुरुषाची जात तिथं फसायची
कधी रागाचा नकार लटका, गोर्या मानेस मोहक झटका
जाईल उडून डोईचा जरीपटका
तिकडं दावुनिया हुल, इकडं पाडेल भूल
लढत गनिमी काव्याची, पुरुषाची जात तिथं फसायची
मुखी विडा रंगला केशरी, श्वासांत मिसळली कस्तुरी
मुखी विडा रंगला केशरी
एक दोन तीन चार, वाजे तुणतुण्याची तार
मुजर्याला मान जिथे लवायची, पुरुषाची जात तिथं फसायची
