जीवनात ही घडी अशीच राहु दे
प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचु दे
रंगविले मी मनात चित्र देखणे
आवडले वेडीला स्वप्न खेळणे
स्वप्नातील चांदवा जिवास लाभु दे
हळूच तुला बघण्याचा छंद आगळा
लज्जेचा त्याविण का अर्थ वेगळा
स्पर्शातून अंग अंग धुंद होउ दे
पाहू दे असेच तुला नित्य हासता
जाऊ दे असाच काळ शब्द झेलता
मीलनात प्रेमगीत धन्य होउ दे
