Sur Niragas Ho Song Lyrics in Marathi

सूर निरागस हो
गणपती, सूर निरागस हो

शुभनयना करुणामय गौरीहर श्रीवरदविनायक ॐकार गणपती
ॐकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती
लीन निरंतर हो
सूर निरागस हो

मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया
गजवदना तू सुखकर्ता
गजवदना तू दुःखहर्ता
गजवदना मोरया मोरया

सूरसुमनांनी भरली ओंजळ
नित्य रिती व्हावी चरणांवर
तान्हे बालक सुमधुर हासे
भाव तसे वाहो सुरांतून

ॐकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती
अधिपती सुखपती छंदपती गंधपती सूरपती
लीन निरंतर हो
सूर निरागस हो

गीत – मंगेश कांगणे
संगीत – शंकर-एहसान-लॉय
स्वर – शंकर महादेवन, आनंदी जोशी
चित्रपट – कट्यार काळजात घुसली