Ganjalya Oothas Mazya Dhar Song Lyrics in Marathi

गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे

पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे

सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो
सारखे अस्तित्व माझे पेटताना दर्वळू दे

लाभु दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतू
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे

गीत – सुरेश भट
संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर – रवींद्र साठे
चित्रपट – उंबरठा