Jashil Kothe Muli Tu Song Lyrics in Marathi

जाशिल कोठे मुली तू?
नेशिल तेथे मुला तू

नेऊ कुठे मी तुला सुंदरी
स्वप्‍नात ने, यक्षभूमीवरी
स्वप्‍न कोठे वसे? त्यात जावे कसे?
हात हाती धरी संगती चाल तू

प्रीतीचा प्रांत का अजून ना लागला
भृंग गाती पहा चुंबताना फुला
वृक्ष आणि लता, डोलती बिलगता
पाहुनी घे गडे प्रीतीची रीत तू

आनंद लाभे मना-लोचना
प्रीतीमुळे ही फुले भावना
ती कथा राहिली, प्रीत ना पाहिली
पांघरू पाहसी व्यर्थ का वेड तू

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – आशा भोसले, रवींद्र साठे
चित्रपट – आराम हराम आहे