Mi Aaj Phool Zale Song Lyrics in Marathi

मी आज फूल झाले, मी आज फूल झाले
जणू कालच्या कळीला लावण्यरूप आले

सोन्याहुनी सतेज ही भासते सकाळ
किरणांतुनी रवि हा फेकीत इंद्रजाल
मी बावरी खुळी ग, या सावलीस भ्याले

आली कशी कळेना ओठांस आज लाली
स्पर्शून जाय वारा, शब्दास जाग आली
फुलवून पाकळ्या मी ओल्या दंवात न्हाले

मी पाहते मला का डोळे भरून आज?
लागेल दृष्ट माझी, पदरी लपेल लाज
मी आज यौवनाचा शृंगारसाज ल्याले

गीत – जगदीश खेबूडकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – आशा भोसले
चित्रपट – आम्ही जातो अमुच्या गावा