Havas Tu Havas Maj Tu Song Lyrics in Marathi

हवास तू हवास तू
हवास मज तू हवास तू
प्रिया नाचते आनंदाने
दूर उभा का उदास तू?

मदनासम हे रूप देखणे
शब्दाविण हे मुक्त बोलणे
तुझ्यापुढे मज गगन ठेंगणे
ज्योती मी अन्‌ प्रकाश तू

या तेजस्वी डोळ्यांमधुनी
भरदिवसा हो रात्र चांदणी
मुखचंद्राच्या कलाकलांनी
हासविणारा सुहास तू

तारुण्याच्या झाडावरती
मोहक हो‍उनी बसली प्रीती
या प्रीतीच्या पूर्तीसाठी
करशील का रे प्रयास तू

गीत – जगदीश खेबूडकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – आशा भोसले
चित्रपट – आम्ही जातो अमुच्या गावा