ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले
मला हे दत्तगुरू दिसले
माय उभी ही गाय होउनी
पुढे वासरू पाहे वळुनी
कृतज्ञतेचे श्वान बिचारे पायावर झुकले
मला हे दत्तगुरू दिसले
चरण शुभंकर फिरता तुमचे
मंदिर बनले उभ्या घराचे
घुमटामधुनी हृदयपाखरू स्वानंदे फिरले
मला हे दत्तगुरू दिसले
तुम्हीच केली सारी किमया
कृतार्थ झाली माझी काया
तुमच्या हाती माझ्या भवती औदुंबर वसले
मला हे दत्तगुरू दिसले
