Dis Char Zale Man Song Lyrics in Marathi

दिस चार झाले मन पाखरू होऊन
पान पान आर्त आणि झाड बावरून

सांजवेळी जेव्हा येई आठव आठव
दूर कुठे मंदिरात होई घंटारव
उभा अंगावर राही काटा सरसरून

नकळत आठवणी जसे विसरले
वाटेवर इथे तसे ठसे उमटले
दूर वेडेपिसे सूर सनईभरून

झाला जरी शिडकावा धुंद पावसाचा
आता जरी आला इथे ऋतु वसंताचा
ऋतु हा सुखाचा इथला गेला ओसरून

गीत – सौमित्र
संगीत – अशोक पत्की
स्वर – साधना सरगम
चित्रपट – आईशप्पथ