Disate Majla Sukhchitra Nave Song Lyrics in Marathi

दिसते मजला सुखचित्र नवे
मी संसार माझा रेखिते

प्रीत तुझी माझी फुलावी या फुलत्या वेलीपरी
भाव मुके ओठांत यावे गंध जसा सुमनांतरी
शब्दाविना मनभावना अवघ्याच मी तुज सांगते

दिसते मजला सुखचित्र नवे
मी संसार माझा रेखिते

हात तुझा हाती असावा साथ तुझी जन्मांतरी
मी तुझिया मागून यावे आस ही माझ्या उरी
तुजसंगती क्षण रंगती निमिषात मी युग पाहते

दिसते मजला सुखचित्र नवे
मी संसार माझा रेखिते

स्वर्ग मिळे धरणीस जेथे रंग नवे गगनांगणी
सप्तसूरां लेवून यावी रागिणी अनुरागिणी
तुझियासवे सुखवैभवे सौभाग्य हे नित्‌ मागते

दिसते मजला सुखचित्र नवे
मी संसार माझा रेखिते

गीत – शांता शेळके
संगीत – अनिल-अरुण
स्वर – अनुराधा पौडवाल
चित्रपट – अष्टविनायक