Aali Mazya Ghari Hi Diwali Song Lyrics in Marathi

आली माझ्या घरी ही दिवाळी
सप्तरंगात न्हाऊन आली

मंद चांदणे धुंद श्वास हा, मी तर त्यात भिजावे
जन्म जन्म रे तुझ्यासंगती एकरूप मी व्हावे
प्रीत नयनी वसे, लाज गाली हसे
कोर चंद्राची खुलते भाळी

आली माझ्या घरी ही दिवाळी

पाऊल पडता घरी मुकुंदा, गोकुळ हरपून गेले
उटी लाविता अंगी देवा, सुगंध बरसत आले
हर्ष दाटे उरी, नाथ आले घरी
सूर उधळीत आली भूपाळी

आली माझ्या घरी ही दिवाळी

नक्षत्रांचा साज लेवुनी रात्र अंगणी आली
दीप उजळले नयनी माझ्या ही तर दीपावली
संगे होता हरी, जाहले बावरी
मी अभिसारीका ही निराळी

आली माझ्या घरी ही दिवाळी
सप्तरंगात न्हाऊन आली

गीत – मधुसूदन कालेलकर
संगीत – अनिल-अरुण
स्वर – अनुराधा पौडवाल
चित्रपट – अष्टविनायक