Avagha Rang Ek Zala Abhang Lyrics in Marathi

अवघा रंग एक झाला ।
रंगी रंगला श्रीरंग ॥१॥

मी-तूं-पण गेलें वायां ।
पाहतां पंढरीच्या राया ॥२॥

नाहीं भेदाचें तें काम ।
पळोनि गेले क्रोध-काम ॥३॥

देहीं असोनि विदेही ।
सदा समाधिस्थ पाही ॥४॥

पाहते पाहणें गेलें दूरी ।
ह्मणे चोखियाची महारी ॥५॥

– संत सोयराबाई