Mazi Renuka Mauli Abhang Lyrics in Marathi माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची साउली । जैसी वत्सालागी गाय, तैसी अनाथांची माय ॥१॥ हाकेसरशी घाई घाई, वेगे धावतची पायी । आली तापल्या उन्हात, नाही आळस मनात ॥२॥ खाली बैस घे आराम, मुखावरती आला घाम । विष्णुदास आदराने वारा घाली पदराने ॥३॥ – संत विष्णुदास