Deh Shuddha Karuni Abhang Lyrics in Marathi देह शुद्ध करुनी भजनीं भजावे । आणिकाचें नाठवावें दोषगुण ॥१॥ साधनें समाधी नको पां उपाधि । सर्व समबुद्धी करी मन ॥२॥ ह्मणे जनार्दन घेई अनुताप । सांडी पां संकल्प एकनाथा ॥३॥ – संत जनार्दन महाराज