Deen Patit Anyayi Abhang Lyrics in Marathi दीन पतित अन्यायी । शरण आलें विठाबाई ॥१॥ मी तों आहें यातिहीन । नकळे कांहीं आचरण ॥२॥ मज अधिकार नाहीं । भेट देई विठाबाई ॥३॥ ठांव देई चरणापाशीं । तुझी कान्होपात्रा दासी ॥४॥ – संत कान्होपात्रा