Patit Tu Pavna Abhang Lyrics in Marathi पतित तूं पावना । म्हणविसी नारायणा ॥१॥ तरी सांभाळी वचन । ब्रीद वागविशी जाण ॥२॥ याती शुद्ध नाहीं भाव । दुष्ट आचरण स्वभाव ॥३॥ मुखीं नाम नाहीं । कान्होपात्रा शरण पायीं ॥४॥ – संत कान्होपात्रा