Dhyan Karu Jata Man Harapale Abhang Lyrics in Marathi ध्यान करूं जातां मन हारपलें । सगुण तें झालें गुणातीत ॥१॥ जेथें पाहे तेथें राघवाचें ठाण । करीं चापबाण शोभतसे ॥२॥ राम माझे मनीं राम माझे ध्यानीं । शोभे सिंहासनीं राम माझा ॥३॥ रामदास ह्मणे विश्रांति मागणें । जीवींचें सांगणें हितगूज ॥४॥ – समर्थ रामदास