Aamuchi Maliyachi Jaat Abhang Lyrics in Marathi आमुची माळियाची जात । शेत लावूं बागाईत ॥१॥ आम्हां हातीं मोट नाडा । पाणी जातें फुलझाडां ॥२॥ शांति शेवंतीं फुलली । प्रेम जाई-जुई व्याली ॥३॥ सांवत्याने केला मळा । विठ्ठल देखियेला डोळां ॥४॥ – संत सावता माळी