Santbhar Pandharit Kirtanacha Gajar Abhang Lyrics in Marathi संतभार पंढरींत । कीर्तनाचा गजर होत ॥१॥ तेथें असे देव उभा । जैसी समचरणांची शोभा ॥२॥ रंग भरे कीर्तनांत । प्रेमें हरिदास नाचत ॥३॥ सखा विरळा ज्ञानेश्वर । नामयाचा जो जिव्हार ॥४॥ ऐशा संतां शरण जावें । जनी ह्मणे त्याला ध्यावें ॥५॥ – संत जनाबाई