Vithu Majha Lekurvala Abhang Lyrics in Marathi

विठु माझा लेंकुरवाळा ।
संगें गोपाळांचा मेळा ॥१॥

निवृत्ती हा खांद्यावरी ।
सोपानाचा हात धरी ॥२॥

पुढें चाले ज्ञानेश्वर ।
मागें मुक्ताबाई सुंदर ॥३॥

गोराकुंभार मांडीवरी ।
चोखा जीवा बरोबरी ॥४॥

वंका कडेवरी ।
नामा करांगुळी धरी ॥५॥

जनी ह्मणे गोपाळा ।
करी भक्तांचा सोहळा ॥६॥

– संत जनाबाई