Dharila Pandharicha Chor Abhang Lyrics in Marathi

धरिला पंढरीचा चोर ।
प्रेमें बांधुनियां दोर ॥१॥

हृदयी बंदिवान केला ।
आंत विठ्ठल कोंडला ॥२॥

शब्दें केली जडाजडी ।
पायीं विठ्ठलाचे बेडी ॥३॥

सोहं शब्द नाद केला ।
विठ्ठल काकुळती आला ॥४॥

जनी ह्मणे बा विठ्ठला ।
जीवें सोडीं न मी तुजला ॥५॥

– संत जनाबाई