Tulshiche Bani Jani Ukalite Veni Abhang Lyrics in Marathi तुळशीचे बनीं । जनी उकलिते वेणी ॥१॥ हातीं घेऊनियां लोणी । डोई चोळी चक्रपाणि ॥२॥ माझे जनीला नाहीं कोणी । ह्मणुनी देव घाली पाणी ॥३॥ जनी सांगे सर्व लोकां । न्हांऊं घाली माझा पिता ॥४॥ – संत जनाबाई