Aamhi Jave Kavnya Thaya Abhang Lyrics in Marathi आह्मीं जावें कवण्या ठायां । न बोलसी पंढरीराया ॥१॥ सरिता गेली सिंधूपाशीं । जरी तो ठाव न दे तिसी ॥२॥ जळ कोपलें जळचरासी । माता न घे बालकासी ॥३॥ जनी ह्मणें आलें शरण । जरी त्वां धरिलेंसे मौन्य ॥४॥ – संत जनाबाई