Sukhache Je Sukha Abhang Lyrics in Marathi

सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं ।
पुंडलिकापाठीं उभें ठाकें ॥१॥

साजिरें गोजिरें समचरणीं उभें ।
भक्ताचिया लोभें विटेवरी ॥२॥

कर दोनीं कटीं श्रीमुख चांगले ।
शंख चक्र मिरवले गदा पद्म ॥३॥

चोखा ह्मणे शोभे वैजयंती कंठी ।
चंदनाची उटी सर्व अंगीं ॥४॥

– संत चोखामेळा