Kunitari Sanga Ge Abhang Lyrics in Marathi

कुणीतरी सांगा गे ।
माझा कृष्ण देखिला काय ॥१॥

हाती घेउनिया फूल ।
अंगणीं रांगत आलें मूल ।
होतें सारवित मी चूल ।
कैसी भूल पडियेली ॥२॥

माथां शोभे पिंपळपान ।
मेघवर्ण ऐसा जाण ।
त्याला ह्मणती श्रीभगवान ।
योगी ध्यान विश्रांती ॥३॥

एका जनार्दनीं माय ।
घरोघरांप्रती जाय ।
कृष्णा जाणावें तें काय ।
कोणी तरी सांगा गे ॥४॥

– संत एकनाथ