Soyara Sukhacha Visava Bhaktancha Abhang Lyrics in Marathi सोयरा सुखाचा विसांवा भक्तांचा । विठोबा निजाचा मायबाप ॥१॥ कृपाळु दीनांचा पडिभर नामाचा । तोडर ब्रीदाचा साच तया ॥२॥ काया-मनें-वाचा संग करा त्याचा । अनंत जन्मांचा हरेल शीण ॥३॥ नामा ह्मणे आह्मां दीनांचे माहेर । हरी निरंतर ना विसंबे ॥४॥ – संत नामदेव