Visava Vitthal Sukhachi Sauli Abhang Lyrics in Marathi विसांवा विठ्ठल सुखाची साउली । प्रेमेपान्हा घालीं भक्तांवरी ॥१॥ दाखवीं चरण दाखवीं चरण । दाखवीं चरण नारायणा ॥२॥ विठ्ठल आचार विठ्ठल विचार । दावीं निरंतर पाय आतां ॥३॥ नामा ह्मणे नित्य बुडालों संसारीं । धांवोनियां धरीं हातीं मज ॥४॥ – संत नामदेव