Naam Techi Roop Abhang Lyrics in Marathi नाम तेंचि रूप, रूप तेंचि नाम । नामारूप भिन्न नाहीं नाहीं ॥१॥ आकारला देव नामरूपा आला । ह्मणोनी स्थापिलें नामवेदीं ॥२॥ नामापरता मंत्र नाहीं हो आणिक । सांगती ते मूर्ख ज्ञानहीन ॥३॥ नामा ह्मणें नाम केशव केवळ । जाणती प्रेमळ भक्त भले ॥४॥ – संत नामदेव