Dehuda Charan Vajavito Venu Abhang Lyrics in Marathi देहुडा चरण वाजवितो वेणु । गोपिकारमणु स्वामि माझा ॥१॥ देखिलागे माय यमुनेचें तीरीं । हात खांद्यावरी राधिकेच्या ॥२॥ गुंजावर्ण डोळे शिरीं बाबरझोटी । मयूर पिच्छ वेष्टी शोभतसे ॥३॥ सगुण मेघ:श्याम लावण्य सुंदर । नामया दातार केशवराज ॥४॥ – संत नामदेव