Dev Dayanidhi Bhaktancha Kaivari Abhang Lyrics in Marathi देव दयानिधि भक्तांचा कैवारी । नाममात्रें तारी सर्वांलागीं ॥१॥ तया देवराया गावें ही आवडी । लागे मनीं गोडी सर्वकाळ ॥२॥ नाहीं यातिकूळ उच्च-नीच भेद । भाव एक शुद्ध पाहतसे ॥३॥ नामा म्हणे काय सांगावें नवल । अखंड दंडलें व्योमाकार ॥४॥ – संत नामदेव