Dolat Dolat Tamakat Chale Abhang Lyrics in Marathi डोलत डोलत टमकत चाले । गोजिरीं पाउलें टाकूनियां ॥१॥ पायीं रुणझुण वाजतात वाळे । गोपी पाहातां डोळे मन निवे ॥२॥ सांवळें सगुण मानस मोहन । गोपी रंजवण नामा ह्मणे ॥३॥ – संत नामदेव