Kaal Dehasi Aala Khau Abhang Lyrics in Marathi काळ देहासी आला खाऊं । आह्मी आनंदें नाचूं गाऊं ॥१॥ कोणे वेळे काय गाणें । हें तों भगवंता मी नेणें ॥२॥ टाळ मृदुंग दक्षिणेकडे । माझें गाणें पश्चिमेकडे ॥३॥ नामा ह्मणे बा केशवा । जन्मोजन्मीं द्यावी सेवा ॥४॥ – संत नामदेव