Hari Uccharani Anant Paprashi Abhang Lyrics in Marathi हरि उच्चारणीं अनंत पापराशी । जातील लयासि क्षणमात्रें ॥१॥ तृण अग्निमेळें समरस झालें । तैसें नामें केलें जपतां हरि ॥२॥ हरि उच्चारण मंत्र हा अगाध । पळे भूतबाध भेणें तेथें ॥३॥ ज्ञानदेव ह्मणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदां ॥४॥ – संत ज्ञानेश्वर