सगुणाची सेज निर्गुणाची बाज ।
सांवळी विराजे कृष्ण-मूर्ति ॥१॥
मन गेलें ध्यानीं कृष्णचि नयनीं ।
नित्यता पर्वणी कृष्ण-सुखें ॥२॥
हृदय-परिमळीं कृष्ण मनो-मंदिरीं ।
आमुचां माज-घरीं कृष्ण बिंबे ॥३॥
निवृत्ती निघोट ज्ञानदेवा वाट ।
नित्यता वैकुंठ कृष्ण-सुखें ॥४॥
