Mi Maze Mohit Rahile Nivant Abhang Lyrics in Marathi

मी माझें मोहित राहिलें निवांत ।
एकरूप तत्‍व देखिलें गे माये ॥१॥

द्वैताच्या गोष्टी हरपल्या शेवटीं ।
विश्वरुपें मिठि देतु हरी ॥२॥

छाया-माया-काया हरिरूपीं ठायी ।
चिंतिता विलया एक तेजीं ॥३॥

ज्ञानदेवा पाहा ओहंसोहंभावा ।
हरिरूपीं दुहा सर्वकाळ ॥४॥

– संत ज्ञानेश्वर