Janiv Neniv Bhagawanti Naahi Abhang Lyrics in Marathi जाणीव नेणीव भगवंतीं नाही । उच्चारणीं पाहीं मोक्ष सदा ॥१॥ नारायण हरी उच्चार नामाचा । तेथे कळी-काळाचा रीघ नाही ॥२॥ तेथील प्रमाण नेणवे वेदांसी । तें जीवजंतूंसि केंवि कळे ॥३॥ ज्ञानदेवा फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥४॥ – संत ज्ञानेश्वर