Chala Pandharisi Jau Abhang Lyrics in Marathi चला पंढरीसी जाऊं । रखमादेवीवरा पाहूं ॥१॥ डोळे निवतील कान । मना तेथें समाधान ॥२॥ संता महंता होतील भेटी । आनंदे नाचों वाळवंटी ॥३॥ तें तीर्थांचे माहेर । सर्व सुखाचें भांडार ॥४॥ जन्म नाही रे आणीक । तुका ह्मणे माझी भाक ॥५॥ – संत तुकाराम महाराज