Govind Govind Mana Lagliya Chand Abhang Lyrics in Marathi गोविंद गोविंद । मना लागलिया छंद ॥१॥ मग गोविंद ते काया । भेद नाही देवा तया ॥२॥ आनंदले मन । प्रेमें पाझरती लोचन ॥३॥ तुका ह्मणे आळी । जेवी नुरेचि वेगळी ॥४॥ – संत तुकाराम महाराज