Kay Ya Santanche Manu Upkar Abhang Lyrics in Marathi काय या संतांचे मानूं उपकार । मज निरंतर जागविती ॥१॥ काय द्यावें यांसी व्हावें उतराई । ठेवितां हा पायीं जीव थोडा ॥२॥ सहज बोलणें हित उपदेश । करूनि सायास शिकविती ॥३॥ तुका ह्मणे वत्स धेनुवेचे चित्तीं । तैसें मज येथ सांभाळिती ॥४॥ – संत तुकाराम महाराज