Kanyaa Sasuryashi Jaye Abhang Lyrics in Marathi कन्या सासुर्यासीं जाये । मागें परतोनी पाहे ॥१॥ तैसें जालें माझ्या जिवा । केव्हां भेटसी केशवा ॥२॥ चुकलिया माये । बाळ हुरुहुरु पाहे ॥३॥ जीवनावेगळी मासोळी । तैसा तुका तळमळी – संत तुकाराम महाराज