नियती ऐसा खेळ रंगवी
सुन्न घराच्या उंबर्यावरी
सुन्न घराच्या उंबर्यावरी
गर्द घनाचे सावट पसरे
शुभ्र गोजिर्या क्षितिजावरी
शुभ्र गोजिर्या क्षितिजावरी
विणता-विणता का विखरावे
नात्यांमधले चांदण-मोती
नात्यांमधले चांदण-मोती
घडून गेला काय गुन्हा की
क्रूर जाहली अगाध नियती
आयुष्याच्या सुखदु:खांची
दिशा ठरवितो शुभंकर
मार्ग शोधता प्रत्येकाचे
पाऊल पडते अधांतर
पाऊल पडते अधांतर
