Agnihotra Star Pravah Marathi TV Show Title Song Lyrics

अग्‍नि मिळे पुरोहितम्
यज्ञस्य देवाम् ऋत्त्विजम्
होतारम् रत्‍नघातमम्कुठे तुझा जन्म झाला, कुठे तुझे मूळ
पिढ्या पिढ्या वाहणार्‍या नदीचे तू जळ
पसरला वटवृक्ष निबीड नात्यांचा
एक पान घेऊ पाहे शोध अस्तित्वाचा

तळहाती घेउनिया निखारा हा रात्री
अंधाराची वाट चाले कुणी अग्‍निहोत्री
अग्‍निहोत्र… अग्‍निहोत्र…