Kulavadhu Zee Marathi TV Show Title Song Lyrics

माझी डोली चालली ग दूरदेशी नव्या गावा
तिथे सोबतीला येई माझ्या स्वप्‍नांचा रावा

तिथल्या चौकटीत शोधीन माझे नवेसे आभाळ
तिथले ऊन-पाऊस भरतील माझी ओंजळ

स्वप्‍न राही मागे आता व्यथा सतत उरात
नव्या उंबर्‍याची आस जागे तरीही मनात

एक नदी सारखी वाहते मी जणू
पाउलखुणा ठेवून मागे चालले मी कुलवधू