Pimpalpan Marathi TV Show Title Song Lyrics

आठवणींचा लेऊन शेला
नटून बसली माय मराठी

दिवस झेलतो सुसाट वारा
तरीही दिव्यात जिवंत वाती

जगण्यामधल्या अर्थासंगे
बहकुन गेले अक्षर-रान

वार्‍यावरती थिरकत आले
झाडावरुनी पिंपळपान