Ankur Zee Marathi TV Show Title Song Lyrics

सखे ग सये गाऊया आता आनंदाची गाणी गं
आतल्या आत पिऊन टाकू डोळ्यांतले पाणी गं
पाण्यावर त्या एक नव्याचा फुटेल अंकूर गं
विसावयाला एक नव्याने मिळेल माहेर गं

माहेरी जाऊन एकदा फिरून लहान होऊया गं
धरून आईच्या बोटाला नवे पाऊल टाकूया गं
मायेच्या गावा मळभ सारे क्षणांत विरेल गं
मनातले जे येईल ओठी होईल सुरेल गं
तेजाची भाषा नवीन आशा डोळ्यांत हसेल गं
भल्याआडचे बुरेही तेव्हा सहज दिसेल गं

राजहंस तो सहज ओळखी मोत्यांमधले पाणी गं
फक्त विणकरा ऐकू येती धोट्यामधली गाणी गं
निशब्दाच्या कुशीत अलगद गूज नव्याचे रुजते गं
स्वागत करण्या त्याचे अन्‌ मग सृष्टी सारी सजते गं

तुला नि मला दावील दिशा एक स्वत:चा तारा गं
शोधून त्याला जिंकून घेऊ खेळ हा सारा गं