आम्ही म्हणजे, तुम्ही म्हणजे, तुम्ही-आम्ही सारे
ज्यांना पोट आहे, तोंड आहे, जीभ आहे,
सोस आहे चमचमीत खाण्याचं, ते
आम्ही सारे खवय्ये
एकमेकां शिकवीत, नवे काही बनवावे
कितीकिती चोचले ते जिभेचे हे पुरवावे
छान छान देशी-विदेशी पदार्थ जाणून घ्यावे
चुकता-चुकता करता-करता खावे अन् खिलवावे
आम्ही सारे खवय्ये
