Utha Rashtravir Ho Marathi Deshbhakti Songs Lyrics

उठा राष्ट्र्वीर हो सज्ज व्हा उठा चला
सशस्त्र व्हा, उठा चला ।। धृ ।।

युध्द आज पेटले जवान चालले पुढे
मिळूनि सर्व शत्रुला क्षणांत चारुया खडे
एकसंघ होउनी लढू चला, लढू चला
उठा उठा चला चला ।। १ ।।

लाख संकटे जरी, उभी समोर ठाकली
मान ताठ आमुची, कुणापुढे न वाकली
थोर वंश आपुला, महान मार्ग आपुला
उठा उठा, चला चला ।। २ ।।

वायुपुत्र होउनी धरु मुठीत भास्करा
होउनी अगस्तिही पिऊनी टाकू सागरा
रामकृष्ण होऊ या समर्थ होऊया चला
उठा उठा, चला चला ।। ३ ।।

यज्ञकुंड पेटले, प्रचंड हे सभोवती
दुष्ट शत्रू मारुनी तयास देउ आहुती
देवभूमि ही अजिंक्य, दाखवू जगा चला
उठा उठा, चला चला ।। ४ ।।