Ye Re Ye Re Pavsa Marathi Badbad Geet Lyrics

ये रे ये रे पावसा,
तुला देतो पैसा.
पैसा झाला खोटा,
पाऊस आला मोठा!

ये ग ये ग सरी,
माझे मडके भरी.
सर आली धावून,
मडके गेले वाहून!

पाऊस पडतो रिमझिम,
आंगण झाले ओलेचिंब.
पाऊस पडतो मुसळधार,
रान होई हिरवेगार!!