Rachilya Rushi Munini Marathi Bhakti Geet Lyrics

रचिल्या ऋषिमुनींनी ज्याच्या ऋचा अनंत
डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत

वरदायका गणेशा, महदाशया सुरेशा
का वेध लाविसी तू हेरंब एकदंत

येसी जळातुनी तू, कोणा कळे न हेतू
अजुनी भ्रमात सारे योगी-मुनी-महंत

मढ मंदिरात येती जे जे अनन्य भक्त
ते सर्व भाग्यवंत होतात पुण्यवंत

गीत – वसंत बापट
संगीत – यशवंत देव
स्वर – उषा मंगेशकर